शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

कोरोनामुळे थंडावला टाळ, वीणा, पखवाजचा निनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:55 PM

जळगाव नेऊर : गतवर्षीपासून कोरोनाच्या साथीने ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय, कार्यक्रम बंद आहेत. यामध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, इतर धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे टाळ, वीणा, पखवादाचा निनाद थांबला असून, ग्रामीण भागातील मंदिरे सुनी-सुनी वाटत आहेत.

ठळक मुद्देजळगावनेऊर : ग्रामीण भागातील मंदिरे सुनी-सुनी

जळगाव नेऊर : गतवर्षीपासून कोरोनाच्या साथीने ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय, कार्यक्रम बंद आहेत. यामध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, इतर धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे टाळ, वीणा, पखवादाचा निनाद थांबला असून, ग्रामीण भागातील मंदिरे सुनी-सुनी वाटत आहेत.वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु गतवर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. एकादशीनिमित्त चालणारे गावोगावी सामूहिक भजन, कीर्तन, प्रवचन तसेच दररोज सायंकाळी गावातील मंदिरांमध्ये सामूहिक हरिपाठ उपासना चालत असतात.

याला टाळ, विणा, पखवादाची साथ असते मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने लागू असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे. मार्च महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा, मेळावे, उत्सव, मोठ्या प्रमाणात चालू होतात या काळात अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कीर्तनकार, पखवादक, विनेकरी, चोपदार, टाळकरी, प्रवचनकारही या दिवसात व्यस्त असतात, परंतु गतवर्षीपासून कोरोनामुळे संचारबंदी, तर कधी लॉकडाऊन चालूच आहे.

यामुळे सर्व सामूहिक, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम रद्द झाले आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार कुठेही जात नाहीत. आषाढ, श्रावण महिन्यांत गावोगावी काकडा आरती, गाथा पारायण, भजन कीर्तन, प्रवचन, तसेच गावात स्नेहभोजन आदींसह दिनक्रम चालू असतात गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री संप्रदाय पंथाचे सामूहिक भजन, तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन, दररोज मंदिरामध्ये सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान सामूहिक हरिपाठ होत असतो.

त्यामुळे मंदिर परिसरात आनंदमय व भक्तिमय वातावरण निर्माण होते, पण कोरोनाच्या भीतीने व चालू असलेल्या संचारबंदीमुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये यासाठी तुकाराम गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण एकाच व्यक्तीने मंदिरामध्ये बसून त्याच तिथीवर सुरू असल्याचेही दिसून येत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसTempleमंदिर