कोरोना आला अन‌् डेंग्यू गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:36+5:302021-02-05T05:41:36+5:30

नाशिक शहरात जून-जुलैनंतर पावसाळ्यामुळे डेंग्यू सुरू होतो आणि तो फार जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत तो पुरताे. दरवर्षी ही संख्या नऊशे ते हजारपर्यंत ...

Corona came and dengue went! | कोरोना आला अन‌् डेंग्यू गेला!

कोरोना आला अन‌् डेंग्यू गेला!

नाशिक शहरात जून-जुलैनंतर पावसाळ्यामुळे डेंग्यू सुरू होतो आणि तो फार जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत तो पुरताे. दरवर्षी ही संख्या नऊशे ते हजारपर्यंत जाते, परंतु गेल्या वर्षी मात्र नीचांकी संख्येचा विक्रम झाला आहे. गेल्या वर्षी आधी काेरोनामुळे रुग्णालये बंद हेाती आणि नंतर ती सुरू झाली असली, तरी संसर्ग वाढण्याच्या भीतीने अन्य आजार नागरिक अंगावर काढत होते. अत्यंत गंभीर अवस्थेत शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल, तरच नागरिक रुग्णालयात दाखल होत होते, अन्यथा केारोना काळात शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. अर्थात, असे असले, तरी नाशिक महापालिकेने मात्र नेहमी प्रमाणे त्यांची बहुतांश मलेरिया प्रतिबंधक कामे सुरूच ठेवली. त्यातच नागरिकही जास्त घराबाहेर पडले नाही, अशा अनेक बाबींमुळे कोरोना बऱ्यापैकी थोपविला गेला. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांत कोरोनाबाबत जागृती करण्यात येत असून, त्याचाही परिणाम दिसून आला.

नाशिक शहरात २०१३ मध्ये २५१ रुग्ण, २०१४ मध्ये ४६०, तर २०१५ मध्ये ३२८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र, संख्या वाढत जाऊन २०१९ मध्ये हजाराच्या पुढे गेली हेाती. त्यानंतर, गेल्याच वर्षी महापालिकेला दिलासा मिळाला आहे.

इन्फो..

नाशिक महापालिकेच्या वतीने डास निर्मूलनासाठी पेस्ट कंट्रोलचा ठेका देण्यात आला आहे. याशिवाय ३१ वाॅर्डात ६२ पथके आहेत. त्यात प्रत्येकी सात कर्मचारी आहेत. डास निर्मूलनासाठी हे कर्मचारी कार्यवाही करीत असतात. पावसाळ्यात टायर आणि अन्य साहित्य घरोघर जाऊन तपासले जाते. विशेषत: एखाद्या घरात डेंग्यू रुग्ण आढळला की, त्याच्यासह अन्य घरात ही तपासणी केली जाते आणि डेंग्यू डासाची उत्पत्ती स्थळे आढळल्यास प्रति स्पॉट दोनशे रुपये दंड घेतला जातो. गेल्या संपूर्ण वर्षभरात केवळ निवासी क्षेत्रात ११९ नागरिकांकडून १ लाख ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत.

डेंग्यूची लक्षणे

* सतत जोराने ताप येणे आणि ताप लवकर न उतरणे

* सतत अंगदुखी सांधेदुखी, तसेच डोकेदुखी व डोळ्यांच्या खोबणीत दुखणे

* अंगावर लाल पुरळ उमटणे, चट्टे आल्यासारखे उमटणे व ते न जाणे

* सततचा त्रास झाल्यानंतर डेंग्यूच्या लागणीनंतर वजन कमी हेाणे

* सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे रक्तबिंबिका (प्लेटलेट) कमी होणे

इन्फो...

रुग्ण संख्या (ग्राफ)

२०१६- ९३०

२०१७- ९४९

२०१८- ८४४

२०१९- १,१२४

२०२०- ३३६

Web Title: Corona came and dengue went!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.