कोरोनामुळे ग्रामीण भागात व्यवसाय झाले ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:27 IST2020-05-10T22:26:18+5:302020-05-10T22:27:22+5:30
वाके : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले असून, ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे.

कोरोनामुळे ग्रामीण भागात व्यवसाय झाले ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
वाके : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले असून, ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे.
हाताला कामच नसल्याने मजूरवर्गाची मोठी पंचाईत झाली आहे. सीमेंट, लोखंड व इतर बांधकामासाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य मिळत नसल्याने गवंडी, बिगारी कामावर जाणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नाही वीटभट्टीवर जाणारे मजुरांची ही कामे बंदच असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून, इतर मजूरवर्गाची अवस्था बिकट झाली आहे.
हीच परिस्थिती टेलरिंग काम करणाºया कारागिरांची आहे. त्यांचा उदरनिर्वाह शिलाई कामावरच अवलंबून आहे सध्या कोणीच कपडे शिवण्यासाठी येत नसल्याने त्यांच्या हाताला काम नसल्याने तेही कुटुंब अडचणीत आले आहे. जीवनावश्यक वस्तू संपल्या असून कमाईचे साधन काहीच नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. लोहार, सुतार, कुंभार यांच्यासह सर्व बारा बलुतेदारांची अशीच परिस्थिती आहे.
या लॉकडाउनच्या काळात सर्वात जास्त नुकसान वाजंत्रीवाले बँडकलाकारांचे झाले. लग्नसराईत पूर्ण व्यवसाय बुडाल्याने वर्षभराची कमाई हाताची गेल्याने पारंपरिक व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्याही कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच लग्नसराई ही केवळ उन्हाळ्यातच राहत असल्याने त्यातच सर्वत्र लॉकडाउन संचारबंदीमुळे नियोजित विवाह रद्द, तर काही ठिकाणी फक्त नवरदेव नवरी यांच्या मातापित्यांसह मामा, भटजी अशा मोजक्याच लोकांमिळून विवाह करणे पसंद केल्याने आता या वाद्य कलाकारांकडे कोणीही फिरकत नसल्याने मोठे आर्थिक संकट आ वासून उभे राहिले आहे, कारण या लग्नसराईच्या हंगामावरच त्यांच्या वर्षभराची उपजीविका चालत असल्याने यावर शासनाने सकारात्मक विचार करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.