ओझर शहरातील डॉक्टर दाम्पत्याला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:27 IST2020-06-26T22:13:32+5:302020-06-27T01:27:54+5:30
डॉक्टर दाम्पत्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनी आता त्याचा धसका झेतला आहे. ओझरटाऊनशिप येथे राहणारा एचएएल कामगाराचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

ओझर शहरातील डॉक्टर दाम्पत्याला कोरोनाची बाधा
ओझर : येथील डॉक्टर दाम्पत्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनी आता त्याचा धसका झेतला आहे. ओझरटाऊनशिप येथे राहणारा एचएएल कामगाराचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
शहरात सदर डॉक्टर हे प्रख्यात असून परिसरात त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. गुरु वारी (दि.२५) सायंकाळी उपनगरातील एक तरु ण कोरोना बाधित आढळून आला तर त्याच्या दुसºयाच दिवशी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात डॉक्टर दाम्पत्य कोरोना बाधित आढळून आल्याने गावातील मध्यवस्तीत खळबळ उडाली आहे. आधीच गेल्या अनेक दिवसांपासून तांबट लेन हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याठिकाणी लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे तेथील व्यावसायिक अगोदरच बेजार झाले आहेत. त्यात आता डॉक्टर दाम्पत्याचा अहवाल कोरोना बाधित आल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. सदर लॉकडाऊनची धास्ती आधीच नागरिकांनी घेतली आहे. बाधित दाम्पत्य हे पिंपळगाव व दावचवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते तर गावातील भाजी बाजारात देखील गेल्याचे कळते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आणखी बरेच जण आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.