शॉर्टसर्किटमुळे मक्याचा भुसा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 15:43 IST2020-04-11T15:43:05+5:302020-04-11T15:43:32+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे खळ्यावरून गेलेल्या लोंबकळणाऱ्या वीजतारांचे शॉर्ट सर्किट होऊन मका मळणी यंत्रातून निघणाºया भुश्याने पेट घेतला. मळणी यंत्रावर काम करणारे मजूरांनी आग विझविली.

शॉर्टसर्किटमुळे मक्याचा भुसा खाक
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे खळ्यावरून गेलेल्या लोंबकळणाऱ्या वीजतारांचे शॉर्ट सर्किट होऊन मका मळणी यंत्रातून निघणाºया भुश्याने पेट घेतला. मळणी यंत्रावर काम करणारे मजूरांनी आग विझविली. पिळकोस येथील शेतकरी संजय गुजबळ जाधव यांच्या मळ्यातील घरालगत असणाºया खळ्यात सदर घटना घडली. या दुर्घटनेत मळणी यंत्रावर काम करणार्या मजुरांना कुठलीही इजा झाली नसून शेतकऱ्यांच्या व तरु णाच्या सतर्कतेमुळे ाळणी यंत्र त्याला जोडलेलं ट्रकटर सुरक्षित राहिले. यात फक्त शेतकºयाचा जनावरांसाठी चारा म्हुणुन निघालेला भुसा आगीत भस्म झाला. बगडू येथील मळणी यंत्र मालक अभिमन आहेर यांच्या मळणी यंत्राचे किरकोळ नुकसान झाले आहे . महावितरण कंपनीने वीजवाहक तारांची उंची वाढवावी अशी मागणी शेतकरी शांताराम जाधव, अशोक जाधव , बुधा जाधव , नामदेव जाधव ,दत्तू जाधव ,मंगेश जाधव ,जितेंद्र जाधव ,योगेश जाधव , घनशाम जाधव ,दुबळ जाधव,अभिजित वाघ ,दादाजी जाधव ,उत्तम मोरे , साहेबराव आहेर ,केवळ वाघ ,मुरलीधर वाघ , रामदास आहेर यांनी केली आहे.