‘मराठी’ विषयातही कॉपीबहाद्दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:12 IST2020-02-21T01:11:45+5:302020-02-21T01:12:35+5:30
शंभर गुणांच्या मराठी विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा असतानाही मराठीच्या विषयातही कॉपी करणारे बहाद्दर विद्यार्थी आहेतच. २० गुणांची तोंडी, तर ८० गुणांंची लेखी परीक्षा भाषा विषयाची घेतली जाते, त्यानुसार गुरुवारी बारावीच्या मराठी विषयाची ८० गुणांची परीक्षा घेण्यात आली.

‘मराठी’ विषयातही कॉपीबहाद्दर
नाशिक : शंभर गुणांच्या मराठी विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा असतानाही मराठीच्या विषयातही कॉपी करणारे बहाद्दर विद्यार्थी आहेतच. २० गुणांची तोंडी, तर ८० गुणांंची लेखी परीक्षा भाषा विषयाची घेतली जाते, त्यानुसार गुरुवारी बारावीच्या मराठी विषयाची ८० गुणांची परीक्षा घेण्यात आली.
सदर पेपर सोडविताना गैरप्रकार करणारे १२ विद्यार्थी आढळून आले. नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये मायमराठीत कॉपी करणारे विद्यार्थी आढळून आले आहेत. नंदुरबारमध्ये पाच, तर जळगावमध्ये सात याप्रमाणे कॉपी प्रकरणे आढळून आली. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून, नियमानुसार त्यांचा निकाल राखून ठेवला जाणार आहे.
नाशिक आणि धुळे जिल्ह्यात मराठी विषयाला एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी भाषेच्या पेपरला विभागात १९ गैरप्रकारांची (कॉपी) प्रकरणे समोर आली होती. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दहा प्रकरणे होती.