शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

सहकारी सोसायटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Published: June 19, 2014 12:15 AM

नाशिक : जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज शहरातून मोर्चा काढला़ उपनिबंधक कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले़

नाशिक : ‘सहकारी संस्था वाचवा सहकार वाचवा’ अशा घोषणा देत जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज शहरातून मोर्चा काढला़ उपनिबंधक कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले़ गावपातळीवर काम करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या वाचविण्यासाठी कर्जवाटपावर तीन टक्के अनुदान द्यावे, यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी युनियन व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ बी़ डी़ भालेकर मैदान येथून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास प्रारंभ झाला़ शालिमार चौक, प़सा़ नाट्यगृह, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला़ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा त्र्यंबक नाका, गंजमाळ, सारडा सर्कल मार्गे जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडकला़ परंतु या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यास कोणीही अधिकारी नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी अधिकारी येईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला़ सुमारे एक तास आंदोलन केल्यानंतर अखेर उपनिबंधक आहिरे यांनी निवेदन स्वीकारले़ मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ निकम, राजू देसले, भगीरथ शिंदे, राजाराम रायते, बाळासाहेब पवार, पोपट राजोळे आदिंसह सुमारे चारशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला़