शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएसआय’ तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:17 IST

कोरोनाचा शहर व परिसरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये मंगळवारी (दि. ३०) होणारा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षणार्थींचा हिरमोड : औपचारिक सोहळ्यात घेणार शपथ

नाशिक : कोरोनाचा शहर व परिसरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये मंगळवारी (दि. ३०) होणारा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या राज्य पोलीस अकादमीचा संचलन सोहळा हा प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या तुकडीसाठी एक अभिमानाची बाब असते; मात्र ११८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणावरच मागील वर्षापासून कोरोनाचे सावट कायम असल्याने या तुकडीतील पोलीस उपनिरीक्षकांच्या पदरी आतापर्यंत निराशाच पडली आहे. कोरोनाचा अचानकपणे प्रादुर्भाव वाढल्यामुळे थाटामाटात पार पडणारा दीक्षान्त सोहळा हा अगदी साधेपणाने आटोपशीर घेतला जाणार असून संचलन रद्द करत केवळ प्रशिक्षणार्थींना अकादमीच्य वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘खाकी’ची शपथ दिली जाणार आहे. शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर या सोहळ्याकरिता उद्धव ठाकरे यांचा पूर्वनियोजित दौरादेखील रद्द करण्यात आला आहे.  प्रशिक्षण कालावधीदेखील लांबलापोलीस अकादमीत ६६८  प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी विविध प्रकारचे धडे गिरविले. उपनिरीक्षकांच्या ११८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा १७ महिन्यांपेक्षाही अधिक झाला. मागील वर्षी मार्चमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे या प्रशिक्षणार्थींना अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली. कोरोनाकाळात त्यांचे शारीरिक प्रशिक्षण बंद होते. तसेच सर्वांना सामाजिक अंतर पाळत, व्याख्यात्यांकडून ऑनलाइन पद्धतीने धडे घ्यावे लागले. तसेच दोन महिन्यांपूर्वीच सुमारे ६८ पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना कोरोनाची बाधाही झाली होती. या सर्वांचा परिणाम प्रशिक्षण कालावधीवर होऊन तो १७ महिन्यांपेक्षाही अधिक लांबला. या तुकडीचा कोरोनाने संचलन सोहळ्यापर्यंत पिच्छा पुरविला. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरे