मुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:13 IST2019-04-09T01:12:56+5:302019-04-09T01:13:42+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी अर्थात २५वा पदवीदान समारंभ शुक्रवारी ( दि.१२) होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या हा सोहळा पार पडणार आहे.

मुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी अर्थात २५वा पदवीदान समारंभ शुक्रवारी ( दि.१२) होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या हा सोहळा पार पडणार आहे.
मुक्त विद्यापीठातर्फे यावर्षी सुमारे १ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असून, यातील सुमारे एक ते दीड हजार विद्यार्थी पदवीदान सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे. मुक्त विद्यापीठाचा यंदाचा रौप्यमहोत्सवी पदवीदान समारंभ असून, विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि एक हजार ८७४ अभ्यासकेंद्रांमार्फ त विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी सहा लाख १५ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट असून, पीएच.डी, एम.फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या जवळपास १३८ अभ्यासक्रमांच्या एक लाख ४८ हजार २६० विद्यार्थ्यांना यंदा या समारंभात पदवी प्रदान केली जाणार आहे. या सोहळ्याची विद्यापीठ प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे.