शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीवरून पुरोहितांच्या गटात वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:20 AM

येथे नारायण नागबलीच्या विधीच्या अधिकारावरून पुरोहितांच्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शुक्रवारी (दि.७) आनंद आखाड्यातील जागेत त्र्यंबकेश्वर बाहेरील पुरोहितांकडून सुरू असलेल्या नारायण नागबली विधीस हरकत घेत मारहाण करण्याची घटना घडल्याची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली

त्र्यंबकेश्वर : येथे नारायण नागबलीच्या विधीच्या अधिकारावरून पुरोहितांच्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शुक्रवारी (दि.७) आनंद आखाड्यातील जागेत त्र्यंबकेश्वर बाहेरील पुरोहितांकडून सुरू असलेल्या नारायण नागबली विधीस हरकत घेत मारहाण करण्याची घटना घडल्याची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अनिल नारायण कुलकर्णी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, कुलकर्णी हे मुळचे अनकाई ता. येवला येथील रहिवासी असून ते त्यांच्या कुटुंबीयांसह गेल्या २० वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथे पौराहित्य करत आहेत. परंतु बाहेरगावचे पुरोहित असल्याने त्यांना त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबलीचा पूजा विधी करू देण्यास स्थानिक पुरोहितांचा विरोध आहे. त्यामुळेच बाहेरील पुरोहितांनी २०१३ मध्ये बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची स्थापना करून नारायण नागबलीचा विधी करू देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. परंतु त्यास सातत्याने विरोध होत राहिला. त्यामुळे बाहेरील पुराहितांनी त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाडच्याची जागा तीन वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर घेऊन तेथे विधी करण्यास सुरूवात केली. त्यानुसार, शुक्रवारी पूजाविधी संपल्यानंतर स्थानिक ३० ते ३५ पुरोहितांनी आनंद आखाड्यात येऊन पूजाविधीस हरकत घेतली आणि पूजाविधी करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला असा सवाल करत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केल्याची तक्रार फिर्यादित करण्यात आलीआहे.  दरम्यान, यासंदर्भात त्र्यंबक पोलीसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला असून अद्याप पावेतो कोणालाही ताब्यात घेतले नाही. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे करीत आहेत.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious Placesधार्मिक स्थळे