शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

नवसंशोधनामुळे रेडिओथेरेपीचा हृदयावरील परिणाम नियंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:34 AM

ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या रुग्णांना किमोथेरपी देताना पूर्वी हृदयाच्या काही भागांशी त्याचा संपर्क आल्याने हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असायची. पण आता नवीन संशोधनामुळे, उपकरणांमुळे हा त्रास कमी झाला असून, यात किमोथेरपीमुळे होणारे परिणाम टाळण्यावर भर दिला जात आहे. ब्रेस्ट कॅन्सरसह मधुमेह, रक्तदाब, मोनोपॉज अशा साºयांना एकत्रच सामोरे जाताना महिलांना त्रास होतो. पण हा त्रास वेळेवर औषधोपचार, आहार, व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन याद्वारे सहजतेने हाताळू शकतो असा सूर क्युरी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित परिषदेत व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्दे नवीन संशोधनामुळे, उपकरणांमुळे त्रास कमी‘ब्रेस्ट कॅन्सर उपचारापश्चात होणारे परिणाम’ परिसंवाद महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन

नाशिक : ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या रुग्णांना किमोथेरपी देताना पूर्वी हृदयाच्या काही भागांशी त्याचा संपर्क आल्याने हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असायची. पण आता नवीन संशोधनामुळे, उपकरणांमुळे हा त्रास कमी झाला असून, यात किमोथेरपीमुळे होणारे परिणाम टाळण्यावर भर दिला जात आहे. ब्रेस्ट कॅन्सरसह मधुमेह, रक्तदाब, मोनोपॉज अशा साºयांना एकत्रच सामोरे जाताना महिलांना त्रास होतो. पण हा त्रास वेळेवर औषधोपचार, आहार, व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन याद्वारे सहजतेने हाताळू शकतो असा सूर क्युरी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित परिषदेत व्यक्त करण्यात आला.  मुंबई नाका येथील नवीन हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि.२५) पार पडलेल्या या परिषदेत ‘ब्रेस्ट कॅन्सर उपचारापश्चात होणारे परिणाम’ या परिसंवाद सत्रात डॉ. सोना नाग, डॉ. राहुल बावीस्कर, डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर, डॉ. सुचित्रा मेहेता यांनी भाग घेतला. मानवता कॅन्सर सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल वुमन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह, नाग फाउंडेशन यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रियेनंतर होणारे परिणाम (स्तनाचा कडकपणा, हातापायाला मुंग्या येणे) हे उपचार, तत्कालीन परिस्थिती यांच्यामुळे होतात व उपचार पूर्ण होताच ते नाहीसेही होतात, असे यावेळी सांगण्यात आले. गोळ्यांचा नियमित डोस, आहारा कॅल्शियमचे प्रमाण वाढविणे, व्यायाम, योग्य आहार, पथ्यांचे पालन या गोष्टींवर प्राधान्याने भर द्यावा, असे यावेळी सांगण्यात आले.  शेफ नीलेश लिमये यांनी आरोग्यदायी पदार्थांविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. त्यानंतर रेबेका डिसूझा व अश्विनी त्रिपाठी यांनी फिजिओथेरपीबद्दल मार्गदर्शन केले. मुग्धा सातारकर, अर्चना विषये, वंदना अत्रे यांनी यावेळी स्वानुभावातून कॅन्सरच्या लढ्याची कहाणी कथन केली. बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन केले. परिषदेत दिवसभरात ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. राज नगरकर यांनी ‘ब्रेस्ट कॅन्सरची सद्यस्थिती व भविष्य’ या विषयावर माहिती दिली. त्यानंतर ‘ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक तपासणी व पाठपुरावा’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात डॉ. अलोक पावसकर, डॉ. समाधान पवार, डॉ. आदित्य आढाव, डॉ. सागर भालेराव, डॉ. विजय पालवे यांनी भाग घेत उपयुक्तमाहिती दिली.

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टर