कंत्राटी ग्रामसेवकांना मिळाली अनामत रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:38+5:302021-02-05T05:40:38+5:30
गेल्या पाच ते सात वर्षांपासून राज्य सरकारने आर्थिक परिस्थितीचे कारण देत नोकरभरतीवर बंदी घातल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामसेवकांची पदे रिक्त ...

कंत्राटी ग्रामसेवकांना मिळाली अनामत रक्कम
गेल्या पाच ते सात वर्षांपासून राज्य सरकारने आर्थिक परिस्थितीचे कारण देत नोकरभरतीवर बंदी घातल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामसेवकांची पदे रिक्त होती. परिणामी ग्रामपंचायतींच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे पाहून कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवकांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. अवघे ७१०० रुपयांवर या ग्रामसेवकांकडून कामे करून घेण्यात येत असून, तत्पूर्वी त्यांची नेमणूक करताना दहा हजार रुपये अनामत रक्कम भरून घेतली जाते. कंत्राटी ग्रामसेवक कायम झाल्यास त्याची रक्कम परत करण्याची तरतूद आहे.
-------
कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्ती दिलेल्या पंचायत समितीकडूनच दहा हजार रुपये अनामत रक्कम भरून घेतली जाते. ते नियमित सेवेत दाखल झाल्यास संबंधित पंचायत समिती ही अनामत परत करते. जिल्ह्यात सेवेत कायम झालेल्या सर्वांनाच ही रक्कम परत करण्यात आली आहे.
- रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रा.पं.
-------
२६ कंत्राटी ग्रामसेवक सेवेत नियमित
* ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे एकेका ग्रामसेवकाकडे पाच ते सहा ग्रामपंचायतींचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा कामकाजावर परिणाम होतो.
* ग्रामसेवकावरील कामाचा ताण पाहता, ग्रामसेवक भेटत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत असतात.
* कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवकांच्या नियुक्तीपासून जिल्ह्यात २६ ग्रामसेवकांना कायम करण्यात आले आहे.
-------
जिल्ह्यात एकूण ११७९ ग्रामसेवक
२६ कंत्राटी ग्रामसेवक
----------------
कंत्राटी ग्रामसेवक सेवेत नियमित झाल्यानंतर त्याच्या बॅँक खात्यावर अनामत रक्कम परस्पर जमा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे अनामत रक्कम मिळाली नाही, अशी कोणतीही तक्रार संघटनेकडे प्राप्त झालेली नाही.
- भाऊसाहेब खैरनार, संघटना सचिव