लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 14:23 IST2020-07-26T14:23:31+5:302020-07-26T14:23:55+5:30

लासलगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील लासलगाव जवळील टाकळी (विंचूर) हद्दीत रविवारी (दि.२६) पहाटे लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती, अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

Container overturned near Lasalgaon railway gate | लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी

लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी

ठळक मुद्देसुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लासलगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील लासलगाव जवळील टाकळी (विंचूर) हद्दीत रविवारी (दि.२६) पहाटे लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती, अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
निफाड तालुक्यातील टाकळी (विंचूर) येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. चाळीसगाव येथून मुंबईच्या दिशेने लासलगाव मार्गे वायर लूप घेऊन जाणारा कंटेनर विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे गेट जवळ (एम एच ४३ वाय ३६४३) कंटेनर रस्त्याची साईटपट्टी नसल्याने एक ते दीड फुटाच्या खोली मुळे कंटेनर चालकाला अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनर पलटी झाल्याने तेथील सोमनाथ केंदळे यांच्या टपरीचे नुकसान झाले आहे. केंदळे कुटुंब हे बाहेर रस्त्याच्या कडेला झोपतात मात्र पावसाळा सुरू झाल्याने घरात झोपले असल्याने कंटेनर पलटी झाला तेव्हा बाहेर कोणीही झोपलेले नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शन केला जात आहे. (फोटो २६ लासलगाव)

Web Title: Container overturned near Lasalgaon railway gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.