सावरगाव येथे कंटेनर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:33 IST2019-12-26T00:32:44+5:302019-12-26T00:33:25+5:30
येवला : सावरगाव येथील आबा पवार यांच्या कांदाचाळीजवळ ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही वेळातच कंटेनरने पेट घेतला. कंटेनर मनमाडच्या दिशेने येवल्याकडे येत होता, तर ट्रक मनमाडकडे जात होता. सावरगाव भागात भरधाव ट्रक व कंटेनरने एकमेकांना समोरासमोर जोरदार धडक दिली. पेट्रोल आणि डिझेल पाइपलाइनचे पाइप वाहतूक करणाऱ्या कंटेनरने पेट घेतला. यात कंटेनर जळून खाक झाला.

सावरगाव येथे झालेल्या अपघातानंतर चक्काचूर झालेला कंटेनर व ट्रक. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्याने परिसरात धुराचे व आगीचे लोळ पसरले होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
येवला : सावरगाव येथील आबा पवार यांच्या कांदाचाळीजवळ ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही वेळातच कंटेनरने पेट घेतला. कंटेनर मनमाडच्या दिशेने येवल्याकडे येत होता, तर ट्रक मनमाडकडे जात होता. सावरगाव भागात भरधाव ट्रक व कंटेनरने एकमेकांना समोरासमोर जोरदार धडक दिली. पेट्रोल आणि डिझेल पाइपलाइनचे पाइप वाहतूक करणाऱ्या कंटेनरने पेट घेतला. यात कंटेनर जळून खाक झाला. जवळपास दीड तास आगीचे मोठमोठे लोळ निघत होते. या घटनेत ट्रकनेही पेट घेतला. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी तत्काळ अग्निशमनला माहिती दिली. बंब घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु कंटेनर जळून खाक झाला होता.