विषारी औषध सेवन केल्याने इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:12 IST2019-03-18T01:11:35+5:302019-03-18T01:12:33+5:30
आडगाव शिवारातील नांदूरगाव मोरेश्वर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे

विषारी औषध सेवन केल्याने इसमाचा मृत्यू
पंचवटी : आडगाव शिवारातील नांदूरगाव मोरेश्वर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामदास विठ्ठल घोडे असे मृत व्यक्तीचे नाव असून, शुक्रवारी (दि.१५) त्यांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांना उलट्यांसह त्रास होऊ लागल्याने त्यांचा मुलगा तेजस घोडे यांनी जवळच्या खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी आडगाव पोलीस तपास करीत आहे.