शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 21:28 IST

भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आले. धनत्रयोदशीनंतर चौथ्या शनिवारी सुटी असल्याने शासकीय, खासगी कर्मचारी तसेच औद्योगिक वसाहतीच्या कामगारांनी सहकुटुंब बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत भरगच्च गर्दी दिसून आली. 

नाशिक : भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आले. धनत्रयोदशीनंतर चौथ्या शनिवारी सुटी असल्याने शासकीय, खासगी कर्मचारी तसेच औद्योगिक वसाहतीच्या कामगारांनी सहकुटुंब बाजारपेठेतखरेदीसाठी गर्दी केल्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत भरगच्च गर्दी दिसून आली.  शहरात आठवडाभरापासून पावसाच्या वातावरणामुळे दिवाळीच्याखरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याने शनिवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरणासोबतच टिपटिप पाऊस सुरू असला तरी ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. औद्योगिक वसाहत आणि खासगी आस्थापनाच्या कर्मचाºयांना शनिवारपासून सुट्या असल्यामुळे कुटुंबातील सर्वांना कपडे, सजावटीचे साहित्य, लक्ष्मीमातेची प्रतिमा, मूर्ती, पूजा साहित्य, पणत्या, अकाशकंदील, केरसुनीसह किराणा, सुकामेवा, कपडे, खाद्यपदार्थ, भेटवस्तूंची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. शहरातील बाजारपेठांसह विविध मॉलमधील सवलतीकडेही ग्राहक मोठ्या प्रमाणात आक र्षित झाल्याचे पाहायला आले. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घरातील टीव्ही, फ्रीज,वॉशिंगमशीन, एसीसारख्या  इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी केली. त्याचप्रमाणे अनेकांनी दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केली असून, अनेकांनी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नियोजन केले आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चारचाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, संपूर्ण दीपोत्सवात रोज किमान तीनशे ते चारशे दुचाकी वाहनांची विक्री होत आहे. हा आकडा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तीन ते साडेतीन हजारांचा टप्पा पार करण्याची अपेक्षा वितरकांकडून व्यक्त केली जात आहे. तयार फराळ, मिक्स मिठाईला मागणीपारंपरिक दीपोत्सवाचा उत्साह घरोघरी दिसून येत असला तरी सध्याच्या काळात अनेक गृहिणी नोकरी, व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना फराळाचे पदार्थ करण्यासाठी वेळ मिळत नाही परिणामी मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही तयार फराळ तसेच मिक्स मिठाई, काजू कतलीसह सर्वच मिठाईला मोठी मागणी असल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. कॉलनी  किंवा सोसायटीत एकत्रित येऊन पदार्थ करण्यासोबतच आचाºयांकडून फराळाचे पदार्थ तयार करून घेण्याचाही पर्याय वापरला गेला.  

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिकMarketबाजारShoppingखरेदी