सिन्नर तहसील कार्यालयात ग्राहकदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:43 IST2019-12-25T17:42:10+5:302019-12-25T17:43:36+5:30
सिन्नर : येथील तहसील कार्यालयात ग्राहक पंचायतीच्यावतीने ग्राहक दिन उत्साहात साजरा काण्यात आला.

सिन्नर तहसील कार्यालयात ग्राहकदिन उत्साहात
व्यासपीठावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक विश्वनाथ शिरोळे, जनसंपर्क प्रमुख डॉ. श्यामसुंदर झळके, निवृत्त नायब तहसिलदार दत्ता वायचळे, राज्य वीज वितरण कंपनीचे उपअभियंता ऋषीकेश खैरनार, सचिन पवार, पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ, प्रज्ञा हिरे आदि उपस्थित होते. यावेळी दत्ता वायचळे यांनी ग्राहक हा अर्थव्यस्थेचा कणा असून त्याने आपले हक्क व कर्तव्ये जाणून घेतली पाहिजेत. कोणतीही वस्तू विकत घेताना त्याची पक्की पावती घेतल्यास जर फसवणूक झाली तर ग्राहक तक्र ार निवारण केंद्राकडे दाद मागता येईल. त्यासाठी प्रत्येक ग्राहकाने खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. वीज वितरण कंपनीचे उपअभियंता खैरनार यांनी ग्राहकांनी विजेसबंधीच्या कोणत्याही तक्रारी असल्यास लेखी स्वरूपात तक्रार करावी. ग्राहकांनी अंतर्गत तक्र ार निवारण कक्षाशी संपर्क करावा. तरीही आपल्या शंकेचे अथवा तक्र ारींचे निरसन न झाल्यास ग्राहक तक्रार मंचकडे पाठपुरावा करावा. ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक विश्वनाथ शिरोळे यांनी ग्राहक संरक्षण कायदा व त्यामागची पार्श्वभूमी विशद केली. डॉ. झळके यांनी मार्गदर्शन केले. पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा हिरे यांनी आभार मानले. यावेळी भारती भुसारे, सतीश दळवी, शरद आढाव, योगेश कुलकर्णी, मनोज वाघ आदी उपस्थित होते.