ग्राहक, रुग्णांची पिळवणूक थांबविण्यासाठी सतर्क राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:03+5:302021-06-09T04:17:03+5:30

सिन्नर : ग्राहक, रुग्ण यांची होणारी आर्थिक, मानसिक पिळवणूक थांबविण्याकामी पदाधिकारी यांनी सतर्क राहावे. यासाठी समितीचे पदाधिकारी तुमच्या ...

Consumers, be vigilant to stop the extortion of patients | ग्राहक, रुग्णांची पिळवणूक थांबविण्यासाठी सतर्क राहा

ग्राहक, रुग्णांची पिळवणूक थांबविण्यासाठी सतर्क राहा

सिन्नर : ग्राहक, रुग्ण यांची होणारी आर्थिक, मानसिक पिळवणूक थांबविण्याकामी पदाधिकारी यांनी सतर्क राहावे. यासाठी समितीचे पदाधिकारी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे आश्वासन ग्राहक संरक्षण समितीचे राज्याध्यक्ष प्रकाश घोळवे यांनी दिले.

ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा केदारे व राष्ट्रीय महासचिव राजेश आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

राष्ट्रीय अध्यक्ष केदारे यांनी समितीचे ध्येय व उद्देश सांगत भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेणार असल्याचे सूचित केले. राष्ट्रीय महासचिव आंधळे यांनी मार्गदर्शन केले. समितीचे प्रवक्ता रवींद्र पारधे यांनी प्रास्ताविक केले. सचिव सत्यजित जानराव यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष निवृत्ती रोकडे यांनी आभार मानले. बैठकीसाठी १४ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Consumers, be vigilant to stop the extortion of patients