शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

बांधकाम मजुरांची नोंदणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:22 AM

महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने १८ ते ६० वयोगटातील बांधकाम मजुरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याची मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला

नाशिक : महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने १८ ते ६० वयोगटातील बांधकाम मजुरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याची मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या १ मार्चपासून महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांत त्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात येणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. २३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापौरांसह पदाधिकाºयांशी संवाद साधला आणि बांधकाम मजुरांचे विशेष नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले. त्यानुसार, महापौर रंजना भानसी यांनी तातडीने के्रडाईच्या पदाधिकाºयांसमवेत बैठक घेत नोंदणीसाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दि. ४ मार्च रोजी क्रेडाईच्या कार्यालयात नोंदणीसाठी विशेष कक्ष कार्यान्वित केला जाणार असून, सदस्यांकडून होणाºया कामगारांच्या नोंदणीचे शुल्क स्वत: के्रडाईने भरण्याची तयारी दर्शविली आहे. दि. १ मार्चपासून महापालिकेच्या सहाही विभागांत विशेष नोंदणी कक्ष उभारण्याच्या सूचना महापौरांनी विभागीय अधिकाºयांना दिल्या. महापालिकेच्या कोणत्याही प्रकारच्या कंत्राटदारांकडे ९० दिवसांपेक्षा जास्त काळ काम करणाºया मजुरांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार १८ ते ६० वयोगटातील मजुरांना नोंदणी करता येणार असून, त्याने ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित कंत्राटदारांकडून प्राप्त करून ते सादर करणे आवश्यक आहे. कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम मजुरांसाठी २८ प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रसूतीसाठी आर्थिक लाभ, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अपघाती विमा यांसारखे लाभ आहेत. नोंदणी करणाºया बांधकाम मजुरांनाच सदर लाभ मिळू शकतात, असे कामगार उपआयुक्त गुलाब दाभाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, कामगार कल्याण अधिकारी हरिभाऊ फडोळ यांच्यासह क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल व पदाधिकारी उपस्थित होते.विभागात ७३ हजार ५२८ कामगारकामगार कल्याणकारी महामंडळाकडे नाशिक विभागात ७३ हजार ५२८ बांधकाम मजुरांची नोंदणी आहे. त्यात सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यांतील ५६९२, तर उर्वरित नाशिक जिल्ह्यात १० हजार २७७ बांधकाम मजुरांचा समावेश आहे. शासनाकडून एक टक्का कामगार कल्याण सेस म्हणून कापला जातो. महामंडळाकडे सध्या सहा हजार कोटी रुपये असल्याची माहिती कामगार उपआयुक्त दाभाडे यांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका