संविधान जाळून अवमान : विविध संघटनांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:35 AM2018-08-14T00:35:36+5:302018-08-14T00:36:21+5:30

दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळून अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

The Constitution condemned the contempt by: various organizations | संविधान जाळून अवमान : विविध संघटनांकडून निषेध

संविधान जाळून अवमान : विविध संघटनांकडून निषेध

googlenewsNext

नाशिकरोड : दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळून अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.  विभागीय उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना मिलन मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा सभागृहात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट हा कडक केला. त्या विरोधात काही श्रीनिवास पांडे व त्यांचे सहकारी यांनी दिली येथील जंतरमंतर मैदांनावर घोषणा देऊन भारतीय संविधान जाळून अवमान केला. संबंधित समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आकाश भालेराव, अविनाश वाघ, रवि वाघमारे, संजय भालेराव, मनोज वाघ, सागर सोनकांबळे, अंकुश चौधरी, आकाश अहेर, सागर जाधव, कन्हैया केदारे, गौतम धावरे, अक्षय वाकडे, अमोल इंगळे आदींच्या सह्या आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना दिल्ली येथे संविधान  जाळणाºया समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर प्रकाश बागुल, संजय दोंदे, राजाभाऊ दोंदे, इंद्रजित भालेराव, राहुल बागुल, विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, विजय भालेराव, अमोल घोडे, रामा निकम, बापू लोखंडे, अमोल घोडे, उन्मेश थोरात आदींच्या सह्या आहेत.
तसेच बहुजन रयत परिषदेच्या वतीने गावंडे यांना देण्यात
आलेल्या निवेदनात संविधान जाळणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर देवेंद्र साळवे, दत्ता खंडाळे, साहेबराव कोळेखे,  सूर्यकांत भालेराव, राकेश सोनवणे, सागर शिरसाठ, अशोक पगारे, विजय साळवे, अनिल बाविस्कर आदींच्या सह्या आहेत.
प्रबुद्ध महिला मंडळ
प्रबुद्धनगर महिला मंडळाच्या वतीने नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना याबाबत निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर सुरेखा बाविस्कर, जयश्री सोनकांबळे, दीपाली वाघ, सविता आढाव, किरण झनकर, सुनीता पगारे, कलाबाई जाधव, देवूबाई गांगुर्डे, उषा साळवे, मंगल भवार, मंगल खुणे, चंद्रकला मेश्राम, छाया रगडे, मीरा पगारे, मथुरा वाघ, मंदाबाई वाघ, सुनीता पगारे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: The Constitution condemned the contempt by: various organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.