माझे कुटूंब - माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी मतदारसंघासाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:49 PM2020-09-28T23:49:43+5:302020-09-29T01:20:50+5:30

नाशिक: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबविण्यात येणाऱ्या माझ कुटूंब - माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी आरोग्य पथकाला लागणाºया साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २० लाखांच्या निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

Constituency funding for My Family - My Responsibility 'campaign | माझे कुटूंब - माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी मतदारसंघासाठी निधी

माझे कुटूंब - माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी मतदारसंघासाठी निधी

Next
ठळक मुद्दे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत , कटक मंडळे या ठिकाणी सदर मोहिम

नाशिक: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबविण्यात येणाऱ्या माझ कुटूंब - माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी आरोग्य पथकाला लागणाºया साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २० लाखांच्या निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

‘कोविड१९’ या विषाणापासून होणाºया संसर्गजन्य आजाराबद्दल सामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘माझ कुटूंब-माझी जबाबदारी’ -कोविडमुक्त महाराष्टÑ’ ही राज्यव्यापी मोहिम शासनाने हाती घेतलेली आहे. या मोहिमेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात आरोग्य पथके स्थापन करण्यात आली असून या पथकाला स्थानिक आमदार निधीतून मदत करण्यासाठी राज्य शासनाने आमदारांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

राज्यात १५ सप्टेबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत ‘माझ कुटूंब - माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविली जात आहे. यासाठी व्यापक प्रमाणात आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य देखील लागणार आहे. आपल्या मतदारसंघात सक्षमपणे सदर कार्यक्रम राबविण्यासांठी देखील निधीचा विनियोग महत्वाचा ठरणार असून या संदर्भात जाहिर करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार आमदारांना निधीची तरतूद करता येणार आहे. आरोग्य मोहिमेसाठी लागणाºया आवश्यक साहित्यांची खरेदी ही ठरवून दिलेल्या मानांकानुसारच करता येणार आहे. सदस्यांनी केलेल्या शिफारशाीनुसार जिल्हाधिकारी साहित्य पुरविण्याची तरतूद करणार आहेत.

‘कोविड१९’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्हास्तरावर प्रतिबंधात्मक उपाययरोजनेसाठी आमदारांना यापूर्वीच २० लक्ष निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या निधीमधून इन्फ्रारेड थर्मामीटर, फेसमास्क, सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्याची मान्यता देण्यात आलेली होती. कोविडसाठी दिलेला निधी शिल्लक राहिला असेल तर सदर निधीतील उर्वरित रक्कम ही ‘माझ कुटूंब - माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठीच वापरता येणार आहे. किंबहूना त्यासाठीच प्राधान्य देण्याचे सुचित करण्यात आलेले आहे.

आरोग्य पथकाला लागणारे जे काही साहित्य आहे त्यांची यादी तयार करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या यंत्रणांमार्फत आणि नियमांनुसार साहित्यांची खरेदी करावी लागणार आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत , कटक मंडळे या ठिकाणी सदर मोहिम राबविली जाणार आहे.

 

Web Title: Constituency funding for My Family - My Responsibility 'campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.