जोश फाईनबर्ग यांच्या सतारवादनाने जिंकली रसिकांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:19 IST2019-01-20T00:19:28+5:302019-01-20T00:19:47+5:30
मैहर घराण्याचे ख्यातनाम सरोद व सतारवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य व प्रख्यात सतारवादक जोश फाईनबर्ग यांनी आपल्या सतार वादनाने नाशिककरांची मने जिंकली.

जोश फाईनबर्ग यांच्या सतारवादनाने जिंकली रसिकांची मने
नाशिक : मैहर घराण्याचे ख्यातनाम सरोद व सतारवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य व प्रख्यात सतारवादक जोश फाईनबर्ग यांनी आपल्या सतार वादनाने नाशिककरांची मने जिंकली.
शंकराचार्य न्यासच्या सांस्कृतिक विभागातर्फे शनिवारी (दि. १९) जोश फाईनबर्ग यांच्या सतार वादनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना उन्मेश बॅनर्जी यांनी साथसंगत केली. जोश फाईनबर्ग यांनी राग जयजयवंतीने सुरू केलेल्या सतार वादनात पारंपरिक आलाप, जोड, झाला व नंतर ताल रूपकमध्ये बंदिश सादर केली.
त्यानंतर ताल त्रितालमध्ये दुसरी बंदिश सादर केली. राग बिहाग सादर करतानात त्यांनी झंपक तालाचे सादरीकरण केले. त्यानंतर शंकरा रागात त्रिताल सादर करताना अली अकबर खॉँसाहेबांनी बनवलेल्या तालाचे वादन केले. फाईन बर्ग यांनी भैरवीने या संगीत मैफलीचा समारोप करताना आलाप आणि दादरा सादर करीत रसिकांची दाद मिळवली.