इंधन दरवाढीविरुद्ध नाशिक कॉँग्रेसची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:48 IST2019-07-15T18:47:51+5:302019-07-15T18:48:53+5:30
पेट्रोलपंपावर एकत्र जमून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली तसेच प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत, पेट्रोलपंपावर वाहन भरण्यासाठी आलेल्या

इंधन दरवाढीविरुद्ध नाशिक कॉँग्रेसची गांधीगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ प्रस्तावित केली असून, त्याच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी पेट्रोलपंपावर गांधीगिरी करून वाहनचालकांना गुलाबाची फुले वाटप करण्यात आली.
सकाळी १२ वाजता कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्रंब्यक नाका येथील पेट्रोलपंपावर एकत्र जमून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली तसेच प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत, पेट्रोलपंपावर वाहन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी शहर अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, लक्ष्मण जायभावे, रईस शेख, वत्सला खैरे, अध्यक्ष स्वप्नील पाटील, हनीफ बशीर, लक्ष्मण धोत्रे, सुरेश मारू, उद्धव पवार, नीलेश (बबलू) खैरे, गोपालशेठ जगताप, रामकिसन चव्हाण, इसाक कुरेशी, सचिन दीक्षित, अण्णा मोरे, मुन्ना ठाकूर, भगवान आहेर, प्रवीण काटे, भरत पाटील, जावेद शेख, सोमनाथ मोहिते, सुरज चव्हाण, जावेद पठाण, शब्बीर पठाण, सलमान काझी इत्यादी उपस्थित होते.