इगतपुरीत काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 22:42 IST2022-01-20T22:42:46+5:302022-01-20T22:42:46+5:30
इगतपुरी : तालुक्यातील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट रिसाॅर्टमध्ये मुंबई काँग्रेसचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

इगतपुरीत काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर
ठळक मुद्देदोन दिवस चालणाऱ्या शिबिरात काँग्रेसचे दिग्गज नेते हजेरी लावणार
इगतपुरी : तालुक्यातील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये मुंबई काँग्रेसचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या शिबिरात काँग्रेसचे दिग्गज नेते हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.