महापौरपदाच्या खेळीत कॉँग्रेस यशस्वी

By Admin | Updated: June 10, 2017 01:09 IST2017-06-10T01:09:13+5:302017-06-10T01:09:21+5:30

आझादनगर : मालेगाव महानगर पालिका महापौर पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- शिवसेनेची युती झाल्याने शेख रशीद यांच्या माध्यमातुन कॉँग्रेसचा महापौर होण्याची शक्यता आहे

The Congress succeeded in the success of the Mayor's post | महापौरपदाच्या खेळीत कॉँग्रेस यशस्वी

महापौरपदाच्या खेळीत कॉँग्रेस यशस्वी

 रशीद सय्यद ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : मालेगाव महानगर पालिका महापौर पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- शिवसेनेची युती झाल्याने माजी आमदार शेख रशीद यांच्या माध्यमातुन कॉँग्रेसचा महापौर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज भाजपाचे सुनिल गायकवाड व राष्ट्रवादी कॉँग्रेस - जनता दल महायुतीचे गटनेता बुलंद एकबाल यांनी एकत्रीत येत महापौर व उपमहापौर पदाचे अर्ज दाखल केल्याने महाआघाडी व भाजपाची युती झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकावयाची हे अवघ्या सात सदस्यीय एमआयएमवर अवलंबून आहे.
मालेगाव महानगर पालिका निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकु अवस्था झाली आहे. जादुई आकडा गाठणे हा सर्वच पक्षाच्या नेत्यांना नाकीनऊ करण्यासाठी पुरेसा होता. कॉँग्रेस २८ तर राकॉँ-जद महाआघाडीचे २७ सदस्य निवडून आले होते. कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये समेट घडवून आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन झालेल्या प्रयत्नांना अपयश आले. मोठ्या पक्षांकडे सेना-भाजपा किंवा एमआयएमचे समर्थन घेण्याशिवाय पर्याय नव्हता व त्या दिशेने कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आपापल्या परीने सेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्कात होते. वास्तविक प्रथम सेनेचा झुकते पारडे हा मुफ्तींकडेच होते. मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी निवडणुकीत अवघ्या दोन दिवसापूर्वी सेनेच्या दोन नगरसेवकांसाठी प्रचारही केला होता. त्यामुळे निकालापूर्वी राकॉँ व सेनेची युती झाल्याचे जगजाहीर झाले होते.
माजी आमदार शेख रशीद यांनी निवडणुकीपूर्वीच स्वत:ला महापौर पदासाठी आपले नाव घोषित केले असल्याने विद्यमान आमदार आसिफ शेख व स्वत: रशीद शेख यांच्यासाठी महापौर पदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेले शेख रशीद यांनी नेहमी प्रमाणे आपले राजकीय डावपेच यशस्वी करीत शिवसेनेला आपल्याकडे खेचण्यास यश मिळविले. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडूनही शिवसेनेला उपमहापौर पदाची ‘आॅफर’ होती. त्यामुळे सेना कॉँग्रेसकडे कशी आकृष्ट झाली याबाबत नागरिकात चर्चा सुरू आहे. परिणामी राकॉँचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहंमद इस्माईल हे डावपेच आखण्यात मागे पडले असून आता या नाट्यात एमआयएमची भूमिका महत्वाची ठरणार आहे. एमआयएमने सेना ज्यांच्या बाजुने राहील त्यास आम्ही (उघड वा बाहेरुन) पाठींबा देवू अशी पहिल्या दिवसापासूनच सावध भुमिका घेतली आहे.

 

Web Title: The Congress succeeded in the success of the Mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.