नाशिक : कर्नाटकमध्ये कॉँग्रेस व जेडीयुचे सर्वाधिक संख्याबळ असतानाही राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी पाचारण केल्याने राज्यपालांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली सदरचा निर्णय घेतल्याचा आरोप करीत शुक्रवारी शहर कॉँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.दुपारी बारा वाजता शहर कॉँग्रेस भवनापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी कॉँग्रेसचे ध्वज व हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. त्यात प्रामुख्याने ‘संसदेत शिरताना करतात वाकून नमस्कार, प्रत्यक्षात त्यांच्या मनात लोकशाही बद्दल तिरस्कार’, ‘सत्तेचा दुरूपयोग करणा-या केंद्र सरकारचा निषेध असो’ असे नमूद करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घोषणा देत निदर्शने करण्यात आल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांनी कर्नाटकात भाजपाला सरकार बनविण्याची संधी देवून लोकशाही व घटनेतील तरतुदींचा खून केला असून, यापुर्वी मेघालय, मणीपुर, गोवा या राज्यात कॉँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळूनही संधी नाकारण्यात आली होती. कर्नाटकात राज्यपालांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली येवून हा निर्णय घेतला असून, अल्पमतात असूनही भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेवून लोकशाही तत्वाला काळीमा फासला आहे. भाजप व केंद्र सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याने राष्टÑपतींनी यात हस्तक्षेप करून लोकशाहीचे रक्षण करावे अशी मागणीही त्यात करण्या आली आहे. या आंदोलनात माजीमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, सुचिता बच्छाव, सुरेश मारू, मुन्ना ठाकूर, बबलू खैरे, हनीफ बशीर, उद्धव पवार, रफीक तडवी, रूबीना शेख, इसाक कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या विरोधात कॉँग्रेसची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 19:41 IST
दुपारी बारा वाजता शहर कॉँग्रेस भवनापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी कॉँग्रेसचे ध्वज व हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. त्यात प्रामुख्याने ‘संसदेत शिरताना करतात वाकून नमस्कार, प्रत्यक्षात त्यांच्या मनात लोकशाही बद्दल तिरस्कार’, ‘सत्तेचा दुरूपयोग करणा-या केंद्र सरकारचा निषेध असो’ असे नमूद करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घोषणा देत निदर्शने करण्यात आल्यावर
केंद्र सरकारच्या विरोधात कॉँग्रेसची घोषणाबाजी
ठळक मुद्देनिवेदन : लोकशाहीचा गळा घोटल्याची तक्रार‘संसदेत शिरताना करतात वाकून नमस्कार, प्रत्यक्षात त्यांच्या मनात लोकशाही बद्दल तिरस्कार’,