शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात कॉँग्रेसची पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:45 IST

 देशात सातत्याने होत असलेल्या पेट्रल आणि डिजेल्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत काँग्रेसचे आंदोलन केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात

नाशिक : देशात सातत्याने होत असलेल्या पेट्रल आणि डिजेल्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. हे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीने जनता बेहाल असून, कोट्यवधी नागरिकांना त्यांची नोकरी, धंदा टिकवण्याची चिंता लागली आहे. अनेकांवर तर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत जनतेला कुठूनच दिलासा मिळत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्यात ७ जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांचे दर सातत्याने वाढत आहेत. शनिवारपर्यंतची दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये लिटरमागे ९ रुपये १२ पैसे, तर डिझेलमध्ये ११ रुपये इतकी दरवाढ झाली आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर दर निच्चांकी स्तरावर असताना त्याचा फायदा ग्राहकांना देण्यात आला नव्हता. २०१४ या वर्षी पेट्रोलवर ९ रुपये ४० पैसे, तर डिझेलवर ३ रुपये ६५ पैसे एवढेच शुल्क केंद्र शासनाच्या वतीने आकारले जात होते. मात्र, अवघ्या सहा वर्षांत हे शुल्क पेट्रोलला ३२.९८ तर डिझेलला ३१.८३ रुपये इतके आकारले जात आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड भाववाढ होत असून, ते कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नाशिक शाखेच्या वतीने करण्यात आली. कॉँग्रेस कमिटीच्या नाशिक शहर कार्यालयासमोर जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन पार पाडले. यावेळी कॉँग्रेसचे  शहराध्यक्ष शरद आहेर, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकcongressकाँग्रेसPetrolपेट्रोलcorona virusकोरोना वायरस बातम्या