शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कॉँग्रेस-राष्टÑवादीचे नगरसेवक स्वतंत्र्यरीत्या सहलीवर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:24 IST

महाशिव आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षांचे नगरसेवकदेखील सोमवारी (दि.१८) सहलीसाठी रवाना झाले आहेत. या पक्षांनी थेट कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरी आता मात्र उपमहापौरपदासह काही पदांची अपेक्षा असून, त्यावर तडजोडी सुरू आहेत.

नाशिक : महाशिव आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षांचे नगरसेवकदेखील सोमवारी (दि.१८) सहलीसाठी रवाना झाले आहेत. या पक्षांनी थेट कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरी आता मात्र उपमहापौरपदासह काही पदांची अपेक्षा असून, त्यावर तडजोडी सुरू आहेत.महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विरोधकांची मोट बांधण्याची तयारी केली आहे. त्यांच्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरच चर्चा सुरू आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपाबरोबर जाण्याची शक्यता नसली तरी शिवसेनेला साथ देण्याविषयीदेखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही.कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचे मान्य केले, तर कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी मात्र पक्षाचे सहा आणि एक समर्थक अपक्ष असे एकत्रित निर्णय घेतील, असे सांगितले. तर दुसरीकडे राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी रविवारी समीर भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सोमवारी मात्र नगरसेवक सहलीवर रवाना झाले. राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक भुजबळ फॉर्म येथे जमले होते. समीर भुजबळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर खासगी मोटारीने सर्वजण रवाना झाले.कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक सायंकाळी राका कॉलनी येथे कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्या कार्यालयात जमले होते. याठिकाणी शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर रात्री कॉँग्रेसचे सर्व नगरसेवक सहलीवर रवाना झाले.राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक एकत्र असले तरी त्यांना सहज म्हणून अन्यत्र पाठविले जात आहे. यात विशेष असे काहीच नाही. पक्षाच्या नेत्यांनी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले असून, आता त्यासंदर्भात प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. बुधवारी (दि.२०) अर्ज दाखल करण्याच्या वेळी त्यावर योग्य तो निर्णय होईल.- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस