शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

केंद्र सरकारच्या विरोधात कॉँग्रेसची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:42 IST

अनुसूचित जाती जमातीला सरकारी नोकरीत आरक्षणाचा मूलभूत अधिकार नाही, असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वाेच्च न्यायालयात केला असून,

ठळक मुद्देआरक्षण, मागासवर्गीयांवर अन्यायाचा विरोधसरकारने मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट घातला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण नष्ट करण्याचा केंद्र सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात मंगळवारी शहर-जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका बदलावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

कॉँगे्रसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजेपासून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, अनुसूचित जाती जमातीला सरकारी नोकरीत आरक्षणाचा मूलभूत अधिकार नाही, असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वाेच्च न्यायालयात केला असून, सर्वोच्च न्यायालयानेदेखील सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे हे राज्य सरकारवर बंधनकारक नाही, असा निकाल दिला आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असून, या सरकारने मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट घातला आहे. मोदी सरकारने संसदेत या मुद्द्यावरून दिशाभूल करून आपली जबाबदारी झटकली. उत्तराखंड सरकारच्या या भूमिकेबाबत संसदेत केंद्रीय मंत्र्यांनी कॉँग्रेसच्या तत्कालीन सरकारच्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या योजनांच्या निधीत केंद्र सरकार सातत्याने कपात करीत असून, लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात नाही. त्याचबरोबर दलित, आदिवासी व इतर मागावर्गीयांना नोकºयांमध्ये बॅकलॉगही भरत नसून केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात माजी खासदार प्रतापराव वाघ, डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, वत्सला खैरे, सुरेश मारू, ज्ञानेश्वर काळे, बबलू खैरे, वसंत ठाकूर, ज्युली डिसूझा, समिना मेमन आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस