शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जिल्हा रुग्णालयात युवकांचा गोंधळ

By admin | Updated: February 18, 2016 23:30 IST

पोलीस भरती : उमेदवारांनी केसपेपर कक्षाच्या काचा फोडल्या; फलकही फाडले

नाशिक : पोलीस होण्याचे स्वप्न बघत भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्धवट माहितीच्या आधारे जिल्हा रुग्णालयात हुल्लडबाजी करत केसपेपर कक्षाला लक्ष्य करत काचा फोडल्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या गोंधळामुळे बाह्यरुग्ण तपासणी केंद्रात तणावाचे वातावरण पसरले होते. पोलीस दलाचे स्वप्न बघणाऱ्यांनी गैरवर्तन केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘असे पोलीस काय कायदा सुव्यवस्था राखणार’ असा प्रश्न उपस्थित केला.कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्या दलावर आहे त्या दलात सेवा देण्याच्या उद्देशाने भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’या ब्रीदचा अर्थच ध्यानीमनी नसल्याचे जिल्हा रुग्णालयात बघावयास मिळाले. मुळात पोलीस भरतीच्या शारीरिक सक्षम चाचणीच्या अगोदर डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसतानाही जिल्हा शासकीय रुग्णालयात जमलेल्या उमेदवारांनी एकच गोंधळ घातला.दरम्यान, केसपेपर कक्षावरून शासकीय शुल्क भरणा केल्याची पावती घेण्यासाठी गर्दी करत उमेदवारांनी कक्षामधील कर्मचाऱ्यांना दमबाजी केली, तर जमावातून काहींनी शिव्यांची लाखोलीही वाहिली. सकाळी साडेनऊ वाजेपासून जमलेल्या या उमेदवारांच्या जमावाने अक्षरक्ष: संपूर्ण बाह्यरुग्ण तपासणी केंद्र डोक्यावर घेतले होते. आपण एका रुग्णालयात उभे आहोत याचेही भान यापैकी कोणालाही नव्हते. जोरजोराने आरडाओरड करत ‘जिल्हा रुग्णालय प्रशासन हाय हाय’च्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. केसपेपर कक्षाभोवती उमेदवारांचा सुरू असलेल्या गोंधळाचा सर्वाधिक फटका उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना बसला. गर्दीमुळे अबालवृद्ध रुग्णांना केसपेपर काढणेही जिकिरीचे झाले होते. यावेळी काही वृद्ध रुग्णांची चेष्टादेखील करण्याचा जमलेल्या उमेदवारांमधून काहींनी प्रयत्नही केला. सामाजिक बांधिलकी, पोलीस दलाचे कर्तव्य, भूमिका आणि जबाबदाऱ्यांचा कुठलाही अभ्यास या उमेदवारांकडे नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. उमेदवारांचा जिल्हा शासकीय रुग्णालयातील हैदोस वाढल्याची बाब सुज्ञ नागरिकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यासह नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी रुग्णालयात येऊन जमावाची समजूत काढली आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची कुठलीही गरज नसल्याचे पटवून दिले. (प्रतिनिधी)