मनपा-शासकीय यंत्रणेतील विसंवादाने आकडेवारीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:58 IST2020-05-30T23:46:56+5:302020-05-30T23:58:09+5:30
नाशिक शहरात आणि जिल्ह्यात किती रु ग्ण तपासले जातात त्यातील किती रुग्ण आणखी निगेटिव्ह येतात, सविस्तर आकडेवारी शासकीय यंत्रणेकडून मिळणे अपेक्षित असताना शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील असमन्वयामुळे गोंधळ उडत आहे.

मनपा-शासकीय यंत्रणेतील विसंवादाने आकडेवारीत गोंधळ
नाशिक : नाशिक शहरात आणि जिल्ह्यात किती रु ग्ण तपासले जातात त्यातील किती रुग्ण आणखी निगेटिव्ह येतात, सविस्तर आकडेवारी शासकीय यंत्रणेकडून मिळणे अपेक्षित असताना शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील असमन्वयामुळे गोंधळ उडत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बाधितांची आकडेवारी महापालिका देत नसल्याची तक्रार शासकीय रुग्णालयाचे अधिकारी करीत आहे, याशिवाय सर्व माहिती निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी, असे महापालिकेला धाडण्यात आल्याचे पत्र पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे महापालिकेने ज्या शासकीय पोर्टलवरून जिल्हा रुग्णालय माहिती घेते, त्याच पोर्टलवरून आता मनपा प्रशासन माहिती घेत असल्याने मनपाकडे वेगळी आणि अतिरिक्त माहिती आहे, असे म्हणणे संयुक्तिक नसल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहरातील बाधित जर बाहेर गावातील असतील किंवा मालेगाव येथील असतील तर त्याची नोंद महापालिकेने घ्यावी काय असा गोंधळ होतो. त्यातून बाधित रुग्णांच्या आकडे शहरात कधी दाखवले जात तर कधी टाळले जात. कधी तर आधी टाळलेले नंतर यादीत दाखवले जात आहे. जिल्हा रुग्णालयात बाधितांबाबत हा गोंधळ असला तरी आता रुग्णाच्या आधारकार्डाचा पत्ता ग्राह्य धरण्याचे शासनाचे आदेश आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालाची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाप्रमाणेच महापालिकाही पोर्टलवरून घेत आहेत. त्यातून कामाला सुलभता येते. याच पोर्टलद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयही माहिती घेते. याशिवाय महापालिकेकडून संबंधित आवश्यक त्या खात्यात माहिती दिली जाते. यासंदर्भात कोणते पत्र आले असेल तर त्याला उत्तर दिले जाईल.
- राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापाालिका