शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

निवृत्तीनाथ समाधी संस्थानच्या मुदतवाढीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:59 IST

त्र्यंबकेश्वर : संपुर्ण वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानची मुदत १५ मे रोजीच संपली आहे. आता मुदत संपून दोन महिने उलटले असून अद्याप धर्मादाय आयुक्तांकडून मुदतवाढी संदर्भात अथवा नवीन नियुक्त्यांसंबंधी काहीही हालचाली केल्या जात नसल्याने विश्वस्त मंडळांसह भाविकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिर्णोद्धाराच्या कामातही व्यत्यय निर्माण झाला आहे.

त्र्यंबकेश्वर : संपुर्ण वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानची मुदत १५ मे रोजीच संपली आहे. आता मुदत संपून दोन महिने उलटले असून अद्याप धर्मादाय आयुक्तांकडून मुदतवाढी संदर्भात अथवा नवीन नियुक्त्यांसंबंधी काहीही हालचाली केल्या जात नसल्याने विश्वस्त मंडळांसह भाविकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिर्णोद्धाराच्या कामातही व्यत्यय निर्माण झाला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयोन एकतर मुदतवाढ द्यावी अथवा नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानची मुदत १५ मे २०२० रोजीच संपलेली असतांना व विश्वस्त मंडळाने एक महिना अगोदर म्हणजे एप्रिल २०२० मध्ये पुढील विश्वस्त मंडळाची मुदत संपणार असल्याची जाणीव करून दिलेली असतानाही त्यावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत संपुर्ण भारतात वारंवार लॉकडाउन वाढवले जात आहे. राज्यातील सहकारी संस्थांना मुदतवाढ देउन आहे तेच संचालक मंडळ कायम ठेवण्यात आले आहेत. सध्या निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम सुरु आहे. त्यासाठी देणगी जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सदयस्थिती पाहता शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची शाश्वती नाही. देणगीदारांच्या भरवशावरच कामाची प्रगती अवलंबून आहे. जिर्णोदधारासाठी जवळपास २२ कोटी रु पयांचा निधी आवश्यक आहे.---------------------लोकसहभागातून जिर्णोद्धारसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी शासनानेही निधी देऊ केला आहे तर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर देणग्याही जमा करण्याचे काम सुरू आहे. समाधी मंदिरासाठी वापरण्यात येणारा काळा पाषाण कोल्हापूर येथून मागविण्यात आला आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे वाहतुकीचे निर्बंध असल्याने पाषाण आणण्यात अडथळे निर्माण झाले होते. आता वाहतूक सुरळीत होत असल्याने कोल्हापूर येथुन काळा पाषाण यायला सुरु वात होईल, त्यानंतर जीर्णोध्दाराचे कामास गती येईल. मात्र, सध्या विश्वस्त मंडळाबाबत कुठलाही निर्णय होत नसल्याने जिर्णोद्धाराच्या कामाबाबतही व्यत्यय निर्माण झालेला आहे.---------------------विश्वस्त मंडळाची मुदत दोन महिन्यापूर्वीच संपलेली आहे. याच कालावधीत दर महिन्याची वारी, उटीची वारी आम्ही शासनाच्या आदेशाने यात्रा न भरविता मंदीरातच फिजिकल डिस्टिन्संग ठेवून मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यानंतर पायी दिंडी सोहळा रद्द करु न शिवशाही बसने पंढरपुर येथे निवृत्तीनाथांच्या पादुका नेल्या. आता मंदीर जीर्णोध्दाराचे काम सुरू केले आहे. त्यासाठी एक तर मुदतवाढ द्यावी किंवा नूतन विश्वस्त मंडळ नियुक्त करावे. जेणेकरून मंदीर जीर्णोध्दाराचे काम तरी पूर्ण होईल.- पवनकुमार भुतडा,अध्यक्ष, निवृत्तीनाथ समाधी संस्थान

टॅग्स :Nashikनाशिक