दिंडोरीत सत्ताधारी- विरोधी गटात संघर्ष
By Admin | Updated: March 26, 2017 22:29 IST2017-03-26T22:29:35+5:302017-03-26T22:29:53+5:30
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतमध्ये सत्ताधारी नगरसेवक व विरोधी दिंडोरी शहर विकास आघाडी यांच्यातील वाद आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

दिंडोरीत सत्ताधारी- विरोधी गटात संघर्ष
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतमध्ये सत्ताधारी नगरसेवक व विरोधी दिंडोरी शहर विकास आघाडी यांच्यातील वाद आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. नुकत्याच नगरपंचायतीच्या विषय समितीच्या निवडणुकीवर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी विकासकामे होत नसल्याचे कारण पुढे करत बहिष्कार टाकला होता. याला सत्ताधारी गटाने उत्तर दिल्यानंतर दिंडोरीच्या नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विकास या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. एकंदरीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगत आहे.सत्ताधारी हे सगळे आम्हीच केले अशी फुशारकी मारत आहेत. हे चुकीचे आहे. आजही पाण्याच्या टाक्यांचे काम अपूर्ण असून, ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या शौचालयाची संकल्पना मोडीत काढून कालबाह्य संकल्पना राबविण्याची किमया केली असून, वैयक्तिक शौचालयाचा निधी मंजूर करून सार्वजनिक शौचालय बांधून वाचणारा पैसा कुठे जातो याचा हिशेब कुठे जातो हा संशोधनाचा मुद्दा आहे. मंजूर रस्त्याचे काम हे नगरसेवक शिवाजी देशमुख यांच्या प्रभागातून न नेता विरुद्ध दिशेने नेले. आठवडे बाजाराची प्रणालीही संशयास्पद आहे. यावर अगोदर चर्चा होणे गरजेचे आहे. आता समोरासमोर चर्चेला तयार व्हावे, असे आवाहन प्रमोद देशमुख व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केले आहे. (वार्ताहर)
दिंडोरीच्या नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विकास या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान सत्ताधारी गटाला दिले असून, नगरपंचायतीच्या कारभारावर निवेदनाद्वारे टीकास्त्र सोडले आहे. शहर विकास आघाडीचे गटनेते प्रमोद देशमुख यांनी सांगितले की, दिंडोरीच्या ओझरखेड पाणी योजनेचा प्रश्न खासदार, आजी-माजी आमदार, पाणीपुरवठा कमिटीचे सभापती, सदस्य व जनतेच्या पाठपुराव्याला यश आल्याने मार्गी लागला. यासाठी शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक ग्रामस्थांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. या सर्वांच्या सांघिक प्रयत्नाला अखेर यश आल्याने ही योजना पूर्ण झाली.