वाहतूक पोलिसांसमोर द्वारकावर कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:09+5:302021-06-26T04:11:09+5:30
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहनांची तपासणी नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गावर महिरावणी जवळील मार्गावर वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असल्याने अनेक ...

वाहतूक पोलिसांसमोर द्वारकावर कोंडी
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहनांची तपासणी
नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गावर महिरावणी जवळील मार्गावर वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असल्याने अनेक दुचाकीस्वार विरूद्ध दिशेने वाहन चालवित असल्याने धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांकडून चारचाकी वाहने तसेच दुचाकीचालकांना अडविले जात असून दंडात्मक कारवाई करीत आहेत.
दुकानांमध्ये डिस्टन्स नियमांकडे दुर्लक्ष
नाशिक : अनलॉकनंतर उद्योग व्यापार सुरू झाले असले तरी दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण नसल्याने प्रादुर्भवाचा धोका वाढला आहे. दुकानदारांकडूनदेखील ग्राहकांना डिस्टन्स राखण्याच्या सूचना करीत नसून दुकानाबाहेर सॅनिटायझर तसेच सुरक्षित अंतराचे मार्कींग नसल्याने गर्दीवर नियंत्रण नसल्याचे दिसते.
जेईई मुख्य परीक्षेची तारीख जाहीर
नाशिक : नॅशनल टेस्टींग एजन्सीतर्फे जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या १७ जुलैपासून या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षा नेमकी कधी घेतली जाणार याविषयी विद्यार्थ्यांना उत्सुकता हेाती. यापूर्वी ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार होती.
तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांना चिंता
नाशिक : जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झाला नसल्याने अपेक्षित पेरण्या झालेल्या नाहीत. सध्या तुरळक पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना पेरण्यांची चिंता लागली आहे. दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे. पुढील आठवड्यातदेखील पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के
नाशिक : जिल्ह्यात रुग्ण बरे हेाण्याची टक्केवारी नाशिकमध्ये ९६.५८ टक्के इतकी असून शहरात ९७.८० टक्के इतके प्रमाण आढळून आले आहे. मालेगावमध्ये ९६ टक्के तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के इतके आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के इतके आहे.