जेएटी महिला महाविद्यालयातील प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:28+5:302021-07-21T04:11:28+5:30
कोविड महामारीच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्व शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात उत्तम प्रकारे प्रशिक्षित व्हावे या ...

जेएटी महिला महाविद्यालयातील प्रशिक्षण शिबिराचा समारोप
कोविड महामारीच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्व शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात उत्तम प्रकारे प्रशिक्षित व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमात आधुनिक टीचिंग ॲप्सचा वापर कशाप्रकारे प्रभावीपणे करण्यात यावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींना संस्थेचे चेअरमन अल्हाज निहाल अहमद अन्सारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष चेअरमन निहाल अहमद अन्सारी यांनी प्रशिक्षणार्थींच्या मेहनतीचे कौतुक केले. संस्थेचे सचिव जैनुलाबदिन मोहम्मद अली, कोषागार मोहम्मद इलियास सेठ, ॲड. नियाज अहमद लोधी, सदस्य तुफैल अहमद निहाल अहमद कारी, सदस्य मोहम्मद आरिफ मोहम्मद मुस्ताक, मिसेस अन्सारी शबीना अनीस अहमद, प्रा. शेख अतिक वासे, अन्सारी उमर फारुख, सलीम खान उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात नुरी अकॅडमीचे प्रा. अताउर रहमान, संगणक विभागाचे रझी अन्वर, डॉ. सलमा सत्तार, प्रा. मुनव्वर अहमद, नावीद अख्तर यांनी प्रशिक्षण दिले. संस्थेचे चेअरमन अल हाज निहाल अहमद अन्सारी यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनेत्रा मेश्रामकर आणि जेएटी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक अश्फाक लाल यांनी केले. प्रा. मुनव्वर अहमद यांनी आभार मानले.