मोहाडी येथे कृष्ण जन्मोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:31 IST2021-09-02T04:31:34+5:302021-09-02T04:31:34+5:30

ग्रंथाची महिलांनी डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली. सोमवारी (दि.३०) मध्यरात्री श्रीकृष्ण वारकरी भजनी मंडळ यांनी ...

Concluding remarks on Krishna's birth anniversary at Mohadi | मोहाडी येथे कृष्ण जन्मोत्सवाची सांगता

मोहाडी येथे कृष्ण जन्मोत्सवाची सांगता

ग्रंथाची महिलांनी डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली. सोमवारी (दि.३०) मध्यरात्री श्रीकृष्ण वारकरी भजनी मंडळ यांनी अभंग म्हणत भक्तिमय जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

यावेळी महिलांनी श्रीकृष्णाचे पाळणे गायिले. यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंगळवारी (दि.३१) सकाळी श्रीकृष्ण मूर्तीला ललित जोशी यांनी सपत्नीक जलाभिषेक केला. सतीश कुलकर्णी, सागर जाखडी यांनी पौरोहित्य केले. महाआरती होऊन प्रसाद वाटप झाला. यानिमित्ताने कानिफनाथ मंदिरात विधिवत पूजन होऊन साट अंगावर मारण्याचा कार्यक्रम झाला. ५० फूट लांब असलेली देवाच्या काठीची मिरवणूक निघून काठी ग्रामदैवत श्री मोहाडमल्ल मंदिरात आणण्यात येऊन काठीची देवभेट करण्यात येते.

सालाबादप्रमाणे मोहाडमल्ल मंदिराच्या प्रांगणात स्व. हरिभाऊ मौले यांच्या घराण्याकडे सार्वजनिक दहीहंडी फोडण्याचा मान असल्याने त्यांचे पणतू आकाश मौले यांनी दहीहंडी फोडली. शेकडो वर्षांची परंपरा आजही मौले घराण्याने टिकून ठेवली आहे.

(०१ मोहाडी)

मोहाडमल्ल मंदिराच्या प्रांगणात मानाची सार्वजनिक दहीहंडी फोडताना आकाश मौले.

010921\01nsk_31_01092021_13.jpg

  मोहाडमल्ल मंदिराच्या प्रांगणात मानाची सार्वजनिक दहीहंडी फोडताना आकाश मौले.

Web Title: Concluding remarks on Krishna's birth anniversary at Mohadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.