कळवणला कृषी संजीवन सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 16:46 IST2020-07-08T16:46:12+5:302020-07-08T16:46:27+5:30
राज्य सरकारच्या कृषी योजनांची माहिती

कळवणला कृषी संजीवन सप्ताहाचा समारोप
कळवण : कळवण तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप खासदार डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे येथे झाला. कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात येऊन केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांची माहिती देण्यात आली. खासदार डॉ भारती पवार यांनी कृषी संजीवनी सप्ताहाचे महत्व विशद करतांना शेतकरी बांधवांशी सवांद साधला. शेतकरी बांधवांनी आपल्या अडचणी पवार यांच्याकडे कथन केल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार , माजी तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, डॉ. अनिल महाजन, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, राजपूत, मंडळ कृषी अधिकारी अरु ण पाटील, कृषी पर्यवेक्षक धुमसे, सरपंच चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते.