वस्त्राेद्याेग प्रकल्पांना वीज दरात सवलतीच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:18 IST2021-08-24T04:18:36+5:302021-08-24T04:18:36+5:30
शहरात २७ अश्वशक्तीपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांना वीज अनुदानासाठी ऑनलाईन नाेंदणीची अट घालण्यात आली आहे. नाेंदणी प्रक्रियेच्या अटींची ...

वस्त्राेद्याेग प्रकल्पांना वीज दरात सवलतीच्या हालचाली
शहरात २७ अश्वशक्तीपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांना वीज अनुदानासाठी ऑनलाईन नाेंदणीची अट घालण्यात आली आहे. नाेंदणी प्रक्रियेच्या अटींची पूर्तता करणे शक्य नसल्याने ऑनलाईन नाेंदणीची अट रद्द करून अनुदानाचा लाभ देण्याची मागणी वस्त्राेद्याेग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे करण्यात आली हाेती. या मागणीची दखल घेत शासन निर्णयान्वये राज्याचे वस्त्राेद्याेग धाेरण जाहीर करण्यात आले आहे. वस्त्राेद्याेग धाेरण २०१८ ते २०२३ अंतर्गत प्रकल्पांना वीज दरात सवलत दिली जाणार आहे. २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जाेडभार असलेल्या यंत्रमाग प्रकल्पांच्या प्रस्तावांना आयुक्त (वस्त्राेद्याेग) यांच्या स्तरावर तपासणी करून मान्यता दिली जाईल. सहकारी व खासगी सूत गिरणी, निटींग, हाेजिअरी, गारमेंटिंग, प्रक्रिया उद्याेग अन्य सर्व वस्त्राेद्याेग प्रस्ताव आयुक्तांकडून मागविले जातील. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना शासनाच्या मान्यतेने सवलत लागू हाेणार आहे. या निर्णयाचे माजी आमदार शेख यांच्यासह यासिन अन्सारी, हाजी माेईन, बशीर सय्यद, शकिल अहमद, माेहंमद इस्त्राईल, सलिम शेख, अल्ताफ अहमद खलिलूरहेमान, मसूद अख्तर, रियाज टेलर, रियाज हाजी व शकिल बेग, आदींनी स्वागत केले आहे.