थकबाकीदारांना तीन हप्त्यांत वीज बिल भरण्याची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:20 IST2021-02-24T21:30:06+5:302021-02-25T01:20:57+5:30
सातपूर :- कोरोना महामारीच्या काळात थकलेली वीज बिले समान तीन हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात आली असून नागरिकांनी थकबाकी भरुन सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांनी केले आहे.

थकबाकीदारांना तीन हप्त्यांत वीज बिल भरण्याची सवलत
सातपूर :- कोरोना महामारीच्या काळात थकलेली वीज बिले समान तीन हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात आली असून नागरिकांनी थकबाकी भरुन सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांनी केले आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे वीज बिलांची थकबाकी वाढली आहे. थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सातपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन थकबाकीदारांना समान हप्ते बांधून द्यावेत.तोपर्यंत थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडू नये.अशी मागणी राष्ट्रवादीचे सातपूर विभाग अध्यक्ष जीवन रायते यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष निलेश भंदुरे,नाशिक चिटणीस अनिस शेख, कार्यध्यक्ष समाधान तिवडे,सिद्धांत काळे,मुन्ना तुपे, प्रभाग अध्यक्ष सचिन उशीर,प्रदीप मुंढे,संघटक अरुण पाटील, तुषार दिवे,संतोष बल्लाळ,प्रशांत गांगुर्डे आदींनी केली.या मागणीची दखल घेऊन थकबाकीदारांनी तीन समान हप्त्यात थकबाकी भरण्यास कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांनी सहमती दर्शवली आहे.