शेतकऱ्यांना अतिक्रमणाच्या नोटिसा मिळाल्याने चिंता मनपाची कारवाई : शेतकरी संतप्त; आमदार सानप यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:33 IST2018-04-09T00:33:05+5:302018-04-09T00:33:05+5:30
आडगाव : नाशिक मनपा हद्दीतील आडगाव, नांदूर आणि मानूर येथील शेतकºयांना मनपा प्रशासनाने अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेतकऱ्यांना अतिक्रमणाच्या नोटिसा मिळाल्याने चिंता मनपाची कारवाई : शेतकरी संतप्त; आमदार सानप यांची भेट
आडगाव : नाशिक मनपा हद्दीतील आडगाव, नांदूर आणि मानूर येथील शेतकºयांना मनपा प्रशासनाने अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकºयांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात एकजूट करीत विरोध दर्शविला असून, यासंदर्भात शेतकºयांनी रविवारी आमदार बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आडगाव, नांदूर आणि मानूर परिसरातील शेतकºयांना मनपा प्रशासनाने नोटिसा बजावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर परिसर हा शहरापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असल्याने फार तोकड्या सुविधा शहराच्या इतर भागाच्या तुलनेत मिळतात. शेतकºयांनी स्वत:च्या जागांवर पत्र्याचे शेड उभारून स्वत: व्यवसाय सुरू केला आहे, तर काहींनी जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी न करता सर्रासपणे नोटिसा बजावल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतीत उत्पन्न मिळत नाही, कर्जमाफीचा लाभ अजूनही काही शेतकºयांना मिळालेला नाही; तर काही लोकांचे जिल्हा बँकेत पैसेदेखील अडकलेले आहेत. अशा परिस्थितीत अडचणीत असलेल्या शेतकºयांचा थोडाफार हातभार असलेला व्यवसाय हिरावून घेतल्यास उपासमारीची वेळ येणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे यासंदर्भात शेतकरी सोमवारी (दि. ९) महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देणार आहेत. शिवाय मंगळवारी (दि. १०) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.