लॅमरोड रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शंका
By Admin | Updated: October 24, 2016 00:33 IST2016-10-24T00:33:05+5:302016-10-24T00:33:35+5:30
लॅमरोड रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शंका

लॅमरोड रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शंका
देवळाली कॅम्प : लॅमरोड रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू झाले असले तरी कामाच्या टिकाऊपणाबद्दल नागरिकांना शंका कायम आहे.
कुंभमेळ्याच्या विशेष निधीतून नाका नं. ६ ते रेस्ट कॅम्परोड नागजिरा नाल्यापर्यंत करण्यात आला. यावेळी रस्त्याचे दुरुस्ती व रुंदीकरणासह डांबरीकरण करण्यात आले, पण दुभाजक मात्र टाकण्यात आले नाही. रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासून घेण्याकरिता छावणी प्रशासनाकडे यंत्रणाच नसल्याने तेव्हा तयार करण्यात आलेला रस्ता काही दिवसातच खड्ड्यातून शोधत देवळालीकरांना जावे लागत होते. ठेकेदाराची छावणी प्रशासनाकडे असलेल्या अनामत रक्कमेतून लॅमरोडची दुरुस्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनकर पाळदे यांनी केली. पाळदे यांच्या मागणीनंतर छावणी प्रशासन अचानकपणे जागे होऊन ठेकेदाराला कार्यान्वित करण्यात आले. नागरिकांनी काम करायचे तर चांगले करा नाही तर नका करू या भूमिकेमुळे काही प्रमाणात जुन्या डांबराचा थर काढून डांबरीकरण करण्याचे ठरविण्यात आले. (वार्ताहर)