संगणक प्रिचालकांचा संप सात दिवसांपासून सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 18:58 IST2019-08-24T18:57:50+5:302019-08-24T18:58:10+5:30
संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन सार्त दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

संगणक प्रिचालकांचा संप सात दिवसांपासून सुरूच
मानोरी : संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन सार्त दिवसांपासून सुरूच आहे.
शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचालकांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत राज्य शासन प्रलंबित मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत कामबंदच ठेवणार असल्याची माहिती येवला तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सोपान सुराशे यांनी दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या संगणक परिचालक आंदोलनात आयटी महामंडळात समाविष्ट करणे, चौदाव्या वित्त आयोगातून मानधन न देता थेट राज्य शासनाने मानधन देण्यासाठी आश्वासन दिले होते. परंतु आठ महिने उलटूनही याबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने संगणक परिचालकांकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत चालल्या असून त्यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागनी नागरिकांनीही केली आहे.