शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बदलत्या अभ्यासक्रमाची  सर्वांगीण ओळख व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:05 IST

विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा दहावीतील परीक्षेपुरता विचार करू नये, तर जिज्ञासा वाढवून भविष्यातदेखील या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा कसा फायदा होईल याचा विचार करावा, त्यामुळे विद्यार्थी न बनता ज्ञानार्थी बना, असा सल्ला मान्यवर शिक्षणतज्ज्ञांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत दिला.

नाशिक : विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा दहावीतील परीक्षेपुरता विचार करू नये, तर जिज्ञासा वाढवून भविष्यातदेखील या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा कसा फायदा होईल याचा विचार करावा, त्यामुळे विद्यार्थी न बनता ज्ञानार्थी बना, असा सल्ला मान्यवर शिक्षणतज्ज्ञांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत दिला. लवाटेनगर येथील लक्षिका मंगल कार्यालयात मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने दहावीचा बदलणारा अभ्यासक्रम आणि बदलणारी मूल्यमापन पद्धती या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे सदस्य असणारे डॉ. स्नेहा जोशी, प्रा. डॉ. अ. ल. देशमुख, प्रा. डॉ. शिवानी लिमये, प्रा. माधव भुसकुटे, प्रा. डॉ. श्रृती चौधरी आदींनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावीच्या वर्गामध्ये सर्व विषयांसंदर्भात शिकवण्याची पद्धत, अभ्यास करण्याची पद्धत, मूल्यमापन पद्धती, गट अभ्यास सहली, विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके अशा विविध अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.  याप्रसंगी डॉ. स्नेहा जोशी यांनी दहावीच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. जोशी यांनी मूल्यमापन आराखडा पुस्तकाचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगून भाषा समृद्ध करण्याचे आवाहन केले. तसेच पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होऊ द्यावे, त्यांना विचार करण्याची संधी द्यावी, असेही स्पष्ट केले.  याप्रसंगी प्रा. डॉ. शिवानी लिमये यांनी इतिहास, राज्यशास्त्र विषय हे इंग्रजी, गणित आणि विज्ञानाइतकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून इतिहासातील अभ्यासक्रमाचे बारकावे स्पष्ट केले.  प्रमुख पाहुणे विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर व वृंदा लवाटे यांनीही मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी डॉ. धनंजय अहिरे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना जीवनातील दहावी परीक्षेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन तृप्ती बक्षी यांनी केले. प्रास्ताविक अजित टक्के यांनी केले.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादशैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दहावी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीविषयी आयोजित केलेल्या या कार्यशाळेला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात रचना व नवरचना विद्यालय, आदर्श शाळा, आनंद निकेतन शाळा तसेच जिल्हा परिषद व महापालिका शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा