मालेगावी पूर्वभागात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:10 IST2020-01-29T23:10:42+5:302020-01-30T00:10:17+5:30
बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील पूर्व भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णत: बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

मालेगावी किदवाई रस्त्यावर असलेला शुकशुकाट.
मालेगाव मध्य : बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील पूर्व भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णत: बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा मागे घेण्यात यावा याप्रमुख मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील कॉँग्रेस, एमआयएम, महागठबंधन या प्रमुख राजकीय पक्षासह दस्तूर बचाव कमिटी, दस्तूर-ए-हिंद बचाव कमिटी व धार्मिक घटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवत व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार, प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पूर्व भागातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत बंदमध्ये सहभागी झाले होते. काही भागात काही प्रमाणात चहाचे हॉटेल, लहान व्यवसाय सुरू होते. मात्र सर्वच बंद असल्याची माहिती मिळताच त्यांनीही दुकाने बंद केल्याने शंभर टक्के बंद पाळला गेला. बंदमध्ये यंत्रमाग व्यवसाय, भाजीपाला बाजार, हॉटेल, दुकानदार सामील झाले होते.
शहर कॉँग्रेसतर्फे शहरातील हजारखोली, गुलशेरनगर, आयेशानगर अशा विविध भागात कॉँग्रेसतर्फे महिलांचे धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महापौर ताहेरा शेख करीत आहेत. सुन्नी तनजीमतर्फे जुना आग्रा रस्त्यावरील हुसेन कम्पाउण्डमध्ये मागील आठवडाभरापासून महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे.