शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणेगाव दरसवाडी कालव्यावरचे रेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करा : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:55 IST

पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक देवसाने (मांजरपाडा) वळण योजनेतील पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.  देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास विभागाचे कार्यकारी संचालक एन.व्ही.शिंदे यांच्याशी  त्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर या प्रकल्पाची सर्व अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून या प्रकल्पाबाबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, देवसाने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.मांजरपाडा हा नाशिक जिल्ह्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. यातून नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी देणे शक्य होणार आहे. नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील कालेश्वरम प्रकल्पाचा अभ्यास करून मराठवाड्याला पाणी वळविण्याबाबत अहवाल तयार करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  तसेच  पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील १ ते २५ किलोमीटर अंतराचे विस्तारिकरणाचे काम पूर्ण झाले असून पाणी अधिक गतीने पुढे जाणार असल्याने पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी हे येवला तालुक्यात जाऊ शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळrailwayरेल्वे