शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:42 PM2020-01-24T23:42:47+5:302020-01-25T00:07:42+5:30

जिल्ह्णातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने अनुदान पाठविले. जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांमार्फत अनुदान वितरीत केले. मात्र, अद्यापही काही तालुक्यांतील शेतकºयांना अनुदान प्राप्त झालेले नाही. यासाठी ज्या शेतकºयांच्या खात्यावर अनुदान वर्ग केलेले नाही, त्या शेतकºयांना तत्काळ अनुदान वितरीत करावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी दिले.

Complaints of non-grant to farmers | शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याच्या तक्रारी

शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याच्या तक्रारी

Next
ठळक मुद्देकृषी समिती : माहिती घेण्याचे सभापतींचे आदेश

नाशिक : जिल्ह्णातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने अनुदान पाठविले. जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांमार्फत अनुदान वितरीत केले. मात्र, अद्यापही काही तालुक्यांतील शेतकºयांना अनुदान प्राप्त झालेले नाही. यासाठी ज्या शेतकºयांच्या खात्यावर अनुदान वर्ग केलेले नाही, त्या शेतकºयांना तत्काळ अनुदान वितरीत करावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा सभापती संजय बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत देऊ केलेली असतानाही शेतकºयांना ती मिळालेली नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या.
यावर सभापती बनकर यांनी आढावा घेतला असता, जिल्ह्णासाठी दोन टप्प्यात ५७८ कोटी १३ लाख २९ हजार रुपये वर्ग केले आहे. जिल्ह्णावरून हा निधी तालुकास्तरावर तहसीलदारांकडे वर्ग झाला असून, त्यांनी बॅँकांमार्फत हे अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. मात्र, तहलीदाराकडून हे अनुदान वर्ग झालेले नसल्याची बाब अनेक सदस्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. त्यावर सभापती बनकर यांनी जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले त्यांना तत्काळ अनुदान मिळाले पाहिजे, असे आदेश दिले. सध्या जिल्ह्णामध्ये घाणीचे तेल वापरण्याबाबत मोठा ट्रेंड आलेला आहे. घाण्याचे तेल काढण्यासाठी व शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून तेलाच्या घाणी वाटप करण्यासाठी एक नवीन योजना तयार करावी, अशा सूचना सभापती बनकर यांनी जिल्हा कृषी विकास अधिकाºयांना दिल्या. याबाबत लवकरच राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेणार असल्याचे सभापती बनकर यांनी सांगितले.

Web Title: Complaints of non-grant to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.