वणी ग्रामीण रुग्णालयाबाबत लाेकप्रतिनिधींकडून तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:00+5:302021-07-09T04:11:00+5:30
वणी ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (दि. ८) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे व डॉ. पाटील, तसेच डॉ. ...

वणी ग्रामीण रुग्णालयाबाबत लाेकप्रतिनिधींकडून तक्रारी
वणी ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (दि. ८) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे व डॉ. पाटील, तसेच डॉ. साबळे, डॉ. बागुल यांच्यासमोर चंडिकापूर, अहिवंतवाडी, अंबानेर, मुळाणे, कोल्हेर, पिंप्री अंचला, हस्ते, खोरीपाडा व परिसरातील लोकप्रतिनिधी, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या मांडल्या. वैद्यकीय अधिकारी जागेवर राहत नाही, रुग्णांवर उपचारांची अपेक्षा असताना त्यांना नाशिकला पाठविण्यात येते. रुग्ण व नातेवाइकांबरोबर सौजन्याची भाषा वापरली जात नाही. वेळेवर उपचारांबाबत उदासीनता दाखविण्यात येते. या प्रश्नांचे निराकारण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कोट....
वणी ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व त्याचा पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधी जागृत असताना वैद्यकीय अधिकारी यांनी त्यात लक्ष घालावे. काही अडचणी व समस्या असतील तर आरोग्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- गोकुळ झिरवाळ