सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 00:52 IST2021-04-11T20:53:03+5:302021-04-12T00:52:05+5:30

त्र्यंबकेश्वर : रुग्णालयात शासकीय काम करीत असताना काहींनी तेथे येवून कामात अडथळा आणत तेथील आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी विनायक माळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Complaint of obstruction of government work | सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार

सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : माळेकर यांच्यासह ६ सहका-यांवर गुन्हा नोंद

त्र्यंबकेश्वर : रुग्णालयात शासकीय काम करीत असताना काहींनी तेथे येवून कामात अडथळा आणत तेथील आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी विनायक माळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरसुल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन ठोंबरे हे रुग्णालयात शासकीय सेवा बजावत असतांना संशयीत आरोपी विनायक माळेकर (रा. सारस्ते), योगेश आहेर, हिरामण गावित, मिथुन राऊत, राहुल शार्दुल व जगन पिंपळके हे पॉझिटिव्ह असताना त्यांना त्र्यंबकेश्वर येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये संदर्भित का करत नाही म्हणुन गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणत अर्वाच्य भाषा वापरली व आरडाओरड केला तसेच रुग्णाला हरसुल ग्रामीण रुग्णालयात इतरत्र फिरवून साथरोग पसरविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल डॉ. ठोंबरे यांनी हरसुल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांकडून एका रुग्णासह सहा जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले व सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी भेट देउन परिस्थिती जाणुन घेतली. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलिस उप तनरिक्षक नागवे हे करीत आहेत.

Web Title: Complaint of obstruction of government work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.