शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

हक्काचे पाणी मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली.

येवला : तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली. या बैठकीसाठी भाजपा नेते बाबा डमाळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी डमाळे यांनी समस्या समजावुन घेत आपण जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन व संबंधित अधिकार्यामार्फत ही समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. उंदिरवाडी च्या धामणानदीवरील सर्व बंधारे पाण्याने पालखेड कालव्याच्या आवर्तनातून यापूर्वी भरून दिले जात होते. याकरिता धामणगाव शिवारातील फाळके नाल्यावर झडत होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून ती बंद झाली आहे. या ठिकाणी दरवाजा (गेट) बसवण्याकरीता शेतकर्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. याकरीता अनेक अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सदर समस्याचे निराकरण होत नाही. यासाठी बाबा डमाळे आपला प्रश्न मार्गी लावतील या अपेक्षेने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या समस्यांचा पाठपुरावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत सोडवू असे डमाळे यांनी यावेळी आश्वासन दिले.याप्रसंगी बाळासाहेब देशमुख, मारु ती जेजुरकर, संतोष केंद्रे, प्रशांत देशमुख, संजय देशमुख, गोटीराम देशमुख, मुन्ना देशमुख, बापू देशमुख, अशोक पवार, तुळशीदास देशमुख, दिगंबर जेजुरकर, अरविंद क्षीरसागर, गोविंद क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, शुक्लेश्वर पवार, वाल्मीक  देशमुख, सुदाम गायकवाड, अमोल जेजुरकर, दत्तू चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई