Complaint against father-in-law's son-in-law: Husband kills pregnant wife | सासऱ्याची जावयाविरुध्द फिर्याद : पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला ठार मारले

सासऱ्याची जावयाविरुध्द फिर्याद : पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला ठार मारले

ठळक मुद्देपोलिसांकडून संशयित पतीला अटकखुनाची कबुलीही नाही अन‌् कारणही गुलदस्त्यात

नाशिक : पाथर्डीफाटा येथील म्हाडा घरकुल प्रकल्पाच्या 'सी' विंगमधील दहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत शनिवारी दुपारी एका गरोदर विवाहितेचा खून झाल्याची घटना घडली होती. यापक्ररणी रात्री उशिरा विवाहितेच्या वडिलांनी त्यांच्या जावयाविरुध्द खूनाचा संशय असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी संशयित आरोपी विवाहितेचा पती भरत ढवळा जाधव (२८, रा.फ्लॅट-१००२, म्हाडा इमारत) यास अटक केली आहे. दरम्यान, भरत याने घरात चोर आल्याचा बनाव केल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात स्पष्ट झाले आहे.

सातपुर येथील एका दुकानात काम करणारा भरत हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कोकणवाडी येथील रहिवासी आहे. मयत विवाहिता प्रमीला (२६) हिचा विवाह दोन वर्षांपुर्वी भरसोबत झाला. सुरुवातील भरत हा प्रमीलाला घेऊन पांडवलेणी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. गेल्या वर्षभरापुर्वीच प्रमीला यांचे वडील फिर्यादी तानाजी सावळीराम कचरे (५४, रा. कचरवाडी, ता.इगतपुरी) यांचा भाचा सचिन झोळे याच्या मालकीची म्हाडा इमारतमधील सदनिकेत राहत होते.

शनिवारी प्रमीलाचा पती संशयित भरत याने स्वत: पोलीस नियंत्रण कक्षास संपर्क साधून ह्यघरात चोरटे आले व त्यांनी दागिणे घेऊन माझ्या पत्नीला ठार मारुन पळून गेलेह्ण असे सांगितले; मात्र मयत प्रमिलाच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांकडून नमुद करण्यात आलेली मृत्यूची वेळ आणि घटना यामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचा भरतवर अधिकच संशय बळावला. तसेच घरात कुठल्याही प्रकारची मोठी रोकड नव्हती आणि प्रमीलाच्या अंगावर केवळ मंगळसुत्र आणि कानातले टॉप्सव्यतिरिक्त अन्य दागिणे नव्हते. तसेच घरातील कुठलेही सामान अस्ताव्यस्त झालेले नाही, आणि काही चोरीलासुध्दा गेलेले नाही, असे प्रमीलाचे वडील तानाजी यांनी फिर्यादीत म्हटले असून माझा जावई भरत यानेच प्रमीलाचे तोंड उशीने दाबून व गळा टॉवेलने आवळून ठार मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. संशयित भरत याने सांगितलेली हकीगत घटनास्थळावरील कुठल्याही बाबीशी सुसंगत नसून ती पटणारी नसल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

खुनाची कबुलीही नाही अन‌् कारणही गुलदस्त्यात
प्रमीलाचा काहीतरी कारणावरून तिचा पती भरत जाधव यानेच खून केल्याचा संशय फिर्यादीत कचरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, संशयित भरत याने पोलिसांकडे अद्याप त्याच्या पत्नीच्या खूनाची कबुली दिली नसून त्याने केलेल्या बनावाच्या व्यतीरिक्त तो काहीही माहिती देत नसल्याने प्रमीलाचा खून भरत ने का केला असावा? याचा उलगडा रविवारी (दि.२५) उशिरापर्यंत झालेला नव्हता. भरत यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली. या खुनाचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर हे करीत आहेत.

Web Title: Complaint against father-in-law's son-in-law: Husband kills pregnant wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.